छायाचित्र उपलब्ध नाही.

श्री अंबा देवी मंदिर संस्थान, अमरावती

अमरावती शहराचे हृदय गांधी चौकामध्‍ये अंबादेवीचे मंदीर आहे. हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्‍या दर्शनाला येतात तो त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. नवरात्रीचा सण दसरा असतो तेव्‍हा असतो. मंदीरातील भक्‍त आणी अधिकारी नउ दिवस धार्मीक आणी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवरात्रीच्या सणाला मोठी यात्रा भरलेली आहे असे वाटते. भक्‍तगण मोठया श्रध्‍देने अनवाणी देविच्‍या दर्शनाला येतात. असंख्‍य लोकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था केली आहे. अमरावती रेल्‍वे स्‍टेशन बसस्टॉपपासुन १.५ कि.मी. अतंरावर आहे. अमरावती स्‍टेशनला वाहने आणी टॅक्‍सी उपलब्‍ध आहेत. बडनेरा रेल्‍वे स्‍टेशनला जाण्‍याकरिता टॅक्‍सीं उपलब्‍ध आहेत.

विदर्भाचा राजा भिष्‍मक त्‍यांची मुलगी रुख्‍मीनी. तिने कृष्‍णाच्‍या धैर्य व साहसाच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. ती कृष्‍णावर प्रेम करित होती. तिचा भाउ रूख्‍मीय याने त्‍याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्‍याशी तिचा विवाह ठरविला. रुख्‍मीनीने कृष्‍णाला गुप्‍त निरोप पाठवि‍ला, त्‍या दोघांनी मिळुन योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्‍या पुर्वी तिने अमरावती (महाराष्‍ट्र) येथिल एकविरादेवीच्‍या मंदीरास भेट दिली. काही यादवाच्‍या मदतीने येथुन कृष्‍णाने रुख्‍मीनीला पळवुन नेले. कृष्‍णा रुख्‍मीनीच्‍या भाउ रूख्‍मीय याच्‍याशी लढला. नंतर राजा भिष्‍मकाने त्‍या दोघांचा विवाह ठरवुन दिला.

छायाचित्र उपलब्ध नाही.

श्री एकविरादेवी मंदीर संस्थान, अमरावती

श्री अंबादेवी मंदीराच्‍या बाजुला श्री एकविरादेवी मंदीर आहे. १६६० मध्‍ये अमरावतीच्‍या पंरमासिंह श्री जनार्दन स्‍वामीनी हे मंदीर बांधले आहे. नवरात्रीचा उत्‍सव अंबा देवी आणी एकविरादेवी दोन्‍ही मिळुन साजरा केला जातो. ए‍कविरादेवी ही अदैवत शक्‍ती आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान,श्री क्षेत्र कौंडण्यपूर

चांदुर तहसिल मध्‍ये कौडण्‍यपुर तिर्थक्षेत्र वर्धा नदीच्‍या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक पर्वत, नदीच्‍या पश्चिमेकडील बाजुला श्‍वेत मंदीर आहे. त्‍या मंदीरामध्‍ये चार ब्रम्‍हाच्‍या मुर्ती आर्णी विष्‍णुची मुर्ती आसनस्‍थ आहेत. कौडंण्‍यपुर ही विदर्भाचा राजा भिष्‍मकाची प्राचीन राजधानी होती. राजा भिष्‍मकाच्‍या मुलीचे नाव रूख्‍मीनी. याच पर्वतावर विठ्ठल रुख्‍मीनीचे मंदीर आहे. हजारो लाखो भाविक विठ्ठलाच्‍या दर्शनाला कार्तीक पोर्णिमेला नोंव्‍हेबर महिण्‍यात येतात.

कौडंण्‍यपुर विदर्भ राज्याची राजधानी होती, राजा भीमा यांनी राज्य केले. महाभारत महाकाव्य, दमयंती आणि रुक्मिणीमध्ये उल्लेख केलेल्या दोन प्रसिद्ध स्त्रियांनी येथे वास्तव्य केले. दमयंती ही भीमची कन्या आणि निशात राजकुमार नालाची पत्नी. रुक्मिणी भीष्मकाची कन्या आणि रुक्मिची बहीण होती. ती द्वारका वासुदेव कृष्णाची पहिली पत्नी होती. कौडंण्‍यपुर उत्तर भारतातील प्राचीन प्रवाशांसाठी दक्षिण भारताकडे प्रवेशद्वार होते. तो अयोध्येसारखा प्राचीन भारतातील उत्तरेकडील शहरांशी चांगल्या प्रकारे जोडला गेला. महाभारतात या प्राचीन मार्गाचा उल्लेख आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

रिद्धपुर

अमरावती जिल्ह्यातील मोर्शि तहसीलचा एक गाव आहे. अचिलपूर-मोर्शी रस्त्यावर चांदूर बाजार पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. रिद्धापुर येथे श्री गोविंदप्रभु महाराज आणि श्री चक्रधर स्वामीजी यांचे १५० अधिक चरनक्षेत्र आहेत. राज मठ रिद्धापुरचे मुख्य मंदिर आहे. हे महानुभाव संप्रदायाचे मुख्यालय आहे आणि महानुभावांचे बनारस म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी राज मठ, कृष्णा मंदिर, दत्ता मंदिर आणि सलाम मिया आणि मेहबूब सुभनीचे दरगाह आहेत.

छायाचित्र उपलब्ध नाही.

बहिरम

परतवाडा - (महाराष्ट्र) -बेतूल (मध्यप्रदेश) या रस्तावर सातपुडा पर्वत रांगांच्या दक्षिणेकडील पायथ्यावरील प्रसिद्ध बहिरम बाबा मंदिर हे स्थान आहे. डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून दरवर्षी जानेवारी पर्यंत, ४५ दिवसांच्या कालावधीसाठी येथे जत्रा भरतात. बहिरम यात्रा ही दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला होते असते. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ६० कि. मी इतके आहे. अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

कोंडेश्वर मंदिर, अमरावती

कोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अपर्ण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे. हे मंदिर अमरावती येथे स्थित आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

चांगापूर

चांगापूर येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे . हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या जवळ असून विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. हे ठिकाण अमरावती - परतवाडा या रस्त्यावर आहे. हनुमान जयंती येथे मोठ्या जल्लोष मध्ये साजरी केल्या जाते. जिल्ह्यातील हनुमान भक्तांचे हे श्रद्धा स्थान आहे. येथील भक्त यांना चांगापूर नरेश या नावाने म्हणतात.

छायाचित्र उपलब्ध नाही.

गुरुकुंज, मोझरी

तुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

जहांगीरपूर

जहांगीरपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या पासून अंदाजे ४० कि. मी. अंतरावर आहे. जहांगीरपूर हे धामणगाव रेल्वे या तालुक्यात असून धामणगाव रेल्वे स्थानकापासून १० कि. मी. अंतरावर आहे. जिल्हातील हनुमान भक्त येथे दर शनिवारी भाविक भक्त मोठ्या संख्येनें दर्शनासाठी येतात.

छायाचित्र उपलब्ध नाही.

खंडेश्वर मंदिर(नांदगाव खंडेश्वर)

खंडेश्वर मंदिर (नांदगाव खंडेश्वर) हे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले असून नांदगाव खंडेश्वर ह्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. महाशिवरात्री निमित्य मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव ७ दिवस साजरा करण्यात येत असुन पूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर यात उत्साहाने सामील होतात.

छायाचित्र उपलब्ध नाही.

श्री गुलाबराव महाराज(चांदुर बाजार)

श्री गुलाबराव् महाराज् हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न् समाजातील, आयुष्य ग्रामीण भागातील, अशा प्रतिकुल परिस्थितित त्यानी १३४ ग्रंथ लिहिलेत. प्रज्ञचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा जन्म माधान येथील मोहोड यांच्या कुळात त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील लोणी(टाकळी) या गावी दि. ०६-०७-१८८१ साली झाला. गुलाब गोंदुजी मोहोड हे त्यांचे संपुर्ण नाव. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. संत श्री गुलाबराव महाराजांचे भक्तिधाम हे अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार परिसरात आहे. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ४० कि. मी. आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

शेडगांव (अंजनगाव)

देबुजी झिंगराजी जनरोजकर (फेब्रुवारी २३, १८७६ - डिसेंबर २०, १९६५) हे संत, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे एक संत सामाजिक सुधारक होते. भारतातील गावांसाठी त्यांचे सुधारणांचे दृष्टिकोन हे अजूनही विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगांव या गावी झाला. त्यांनी आपले प्रवचन "कीर्तनकार" स्वरूपात केले ज्यामध्ये त्यांनी माणुसकी आणि करुणा यासारख्या मूल्यांवर जोर दिला. आपल्या कीर्तनादरम्यान त्यांनी अंधश्रद्धा व धार्मिक विधी विरोधात लोकांना शिक्षित केले. शेडगांव हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या तालुक्यात स्थित आहे. शेडगांव येथे गाडगे महाराजांचे मंदिर आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

ऋणमोचन

ऋणमोचन येथील प्रत्येक देवस्थान हे पूर्णा (पयोष्णी) नदीच्या तीरावर असून तिचा प्रवाह पूर्व वाहिनी असल्याचे हे तीर्थ म्हणून पुण्यकारक समजले जाते. गणेश पुराणकर्ते मुद्गल ऋषीचा आश्रम पुराणकाळी येथे होता, तर रुख्मीणी हरणाच्यावेळी परत जातांना श्रीकुष्ण व रुख्मीणी येथे आल्याचा उल्लेखही इतिहासात प्रसिद्ध आहे. भगवान मुद्गलेश्वर म्हणजेच महादेवाचा अवतार होय. महादेव म्हटले म्हणजे सोमवारचे महत्व आहे. पण ऋणमोचनला रविवारचे महत्व आहे. त्यातही पौष महिन्यातील रविवारला भाविक भक्त येथे धार्मिक विधी, नामस्मरण, ओलेत्याने मुदगलेश्वरावर जल वाहणे इ. कार्यामुळे येथे प्राचीन काळापासून यात्रेचे स्वरूप आले.

गृह्त्यागानंतर सेवकार्याची प्रेरणा सन १९०५ साली गाडगे महाराजांना येथेच मिळाली. स्वत: परीश्रम घेऊन नदीवर सुकी माती टाकून घाट बांधणे सुरु केले. पुढे अनेक उदार आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे फरसबंधी घाट बांधले गेले. यात्रेत येणाऱ्या दिन दुबळ्या अनाथ अपंगांना निदान एक वेळ तरी पोटभर अन्न मिळावे , म्हणून सन १९०७ साली सदावर्त सुरु केले. हे सदावर्त दरवर्षी पौष महिन्यात सुरु होऊन रथसप्तमी पर्यत अव्याहतपणे आयतागायत चालू आहे. पौषातील शेवटच्या रविवारी या दिवशी अंध, अपंग, कुष्ट पिडीत, निराधार वृद्ध स्त्री पुरुष, मुलांना मिष्ठान अन्नदान समवेतच वस्त्रदान, भांडीदान इ. ही केले जाते. आजही याचा लाभ ५ ते ७ हजार दिनदुबळ्यांना मिळतो आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

छायाचित्र उपलब्ध नाही.

आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर

आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर हे हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना असून हे मंदिर १२व्या शतकातले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम यादव राजे रामदेव राय यांनी केले आहे. य मंदिराचे वैशिष्ठ असे कि हे मंदिर एकच दगडात कोरलेले असून अश्याप्रकारचा दगड मंदिराच्या ५०० कि.मी. अंतरात सापडत नाही.

छायाचित्र उपलब्ध नाही.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प एक मुख्य अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी. चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.

अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.

मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

चिखलदरा

चिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी सेनापती कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते. चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते.

छायाचित्र उपलब्ध नाही.

मालखेड

मालखेड हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाते. येथे धरण असून अमरावती जिल्ह्यातील चांदूरजवळील कोलाड नदीवर आहे. या धरणाची पायाखालील उंची १७.०५ मीटर (५५.९ फूट) असून लांबी १,४२२ मी (४,६६५ फूट) आहे. हे ठिकाण अमरावती या शहरापासून अंदाजे २० कि. मी. इतके आहे. मालखेड येथे मनोरंजनासाठी पार्क आहे. लहान मुलांच्या सहली येथे येत असतात.

छायाचित्र उपलब्ध नाही.

बांबू उद्यान

बांबू उद्यान हे ४९ एकरात पसरलेले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे बांबू उद्यान आहे. या उद्यानात बांबूच्या ६३ प्रजात्यांची लागवड करण्यात आलेली आहे. या उद्यानात बांबू कुट, बांबू पुल, बांबू गुहा, बांबू वन माहिती केंद्र, कॅक्टस बाग, कमळ बाग, मुलांचे उद्यान यांचा समावेश आहे.

छायाचित्र उपलब्ध नाही.

अप्पर वर्धा धरण

अप्पर वर्धा धरण अमरावती जिल्ह्यातील मोरळी तालुक्यातील शाम्होरा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात आहे. धरण सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा, पूर नियंत्रण आणि जलविद्युतसाठी बहुउद्देशीय फायदे आहे.बहुउद्देशीय अप्पर वर्धा धरण प्रकल्पाला अमरावती शहराची जीवनरेखा मानली जाते आणि मोर्शी आणि वरुद तालुक्या हा अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहे, ज्यात सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापर आणि पूर नियंत्रण यांचा समावेश आहे. जलविद्युत निर्मिती फक्त तेव्हाच होते जेव्हा सिंचन विकसित होते.

या धरणावर स्पिल्वे गेट्सची संख्या १३ इतकी आहे. या धरणाला लागूनच रमणीय बाग आहे. वर्षा ऋतू मध्ये पर्यटकांची गर्दी असते. हे ठिकाण अमरावती पासून अंदाजे ६० कि .मी व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून अंदाजे १२८ कि .मी इतके आहे.